Subscribe to YouTube channel for up coming videos. Facebook: https://www.facebook.com/NamdevShastriOfficial Instagram: https://www.instagram.com/namdevshastr...

डाॅ न्यायाचार्य श्री नामदेव शास्त्री

श्री नामदेव महाराज शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तन व प्रवचनकार असून त्यांचे सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं, त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशात्रा'चं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम. ए. ( मराठी ) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत.

प्रवचन.

डॉ. श्री नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून कीर्तन व प्रवचनकार आहेत. मानसिक समस्या त्यावरील उपाय आणि अध्यात्मिकता  वाढण्यास मदत करण्यासाठी विविध विषयांवर ते बोलत असतात. त्यांचे ज्ञान पारंपारिक असून आधुनिक  काळातील मानसिक समस्येचं त्यात समाधान आहे. मानसिक समस्येच्या समाधानाचे नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला subscribe करा.

 

ज्ञानेश्वरी भावकथा- न्यायाचार्य डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री महंत श्री क्षेत्र भगवान गड. "उपासना" हा भाग पाथर्डी येथील ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण मधील एक भ...